Pages
Search This Blog
Lucky Ali - Anjani Rahon Mein
Ronan Keating & Boyzone - When You Say Nothing At All
Sunday, February 28, 2016
Saturday, February 27, 2016
मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा…!!
प्रेम कुणावर करावं?....कुणावरही करावं
राधेच्या वत्सल स्तनावर करावं
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं
भीष्मद्रोणाच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं
दुर्योधन कर्णाच्या अभिमानी,अपराजित मरणांवर करावं
प्रेम कुणावरही करावं.....
सुदामा नावाच्या भटजीवर करावं
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं
बासरीतुन पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यांवर करावं
यमुनेचा डोह जहरुन टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावर करावं
प्रेम कुणावरही करावं
रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं
मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं
आणि
खङगाच्या पात्यावर करावं
प्रेम कुणावरही करावं
प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं
पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं
यशोदेच्या दुधावर....देवकीच्या आसवांवर करावं
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं
ज्याला तारायचं...त्याच्यावर तर करावंच ,
पण ज्याला मारायचं,त्याच्यावरही करावं
प्रेम कुणावरही करावं
प्रेम योगावर कराव..प्रेम भोगावर करावं
आणी त्याहुन अधिक त्यागावर करावं
प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं
आणि पारध्याच्या बाणांनी घायाळ होवुन
अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं
प्रेम कुणावरही करावं कारण,
प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि...
भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा ऎकमेव..............
कुसुमाग्रज, प्रेमयोग

Monday, February 22, 2016
Subscribe to:
Posts (Atom)